..
प्रतिनिधी - प्रकाश पाटील ,
हि नसेल तर जेवनाला चव नसते , हिच्याशिवाय पदार्थ झणझणीत होतच नाही ... अशी हि चटणी ...
गेल्या अडीच महिण्यापासून कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू असल्याने नागरीकांना व महिलांना घराबाहेर पडता येत नाही . त्याचत पुढे एक महिन्यावर पावसाळा आल्याने या महिन्यातच वर्षभर पुरणारी चटणी करण्यासाठी महिलांची धांदल सुरू आहे .
लॉक डाऊन काळात घराबाहेर पडता आले नसल्याने अनेकांची चटणी करण्याची खोळंबली असून सध्या लॉक डाऊनच्या थोड्याशा शिथिलने बाजारात मिरची खरेदीसाठी गर्दि वाढली आहे . सध्या खरेदी केलेली मिरची ढगाळ वातावरणामुळे वाळत नसल्याने महिलांचा दिवस मिरच्या वाळविण्यात जात आहे . दोन आठवड्यापासून अनेक ठिकाणी वळीव पाऊस पडत असल्याने वातावरण ढगाळ आहे . त्यामुळे महिलांची चटणीबाबत संभ्रमावस्था वाढली आहे .
स्वंयपाक घरात चटणी नसेल तर जेवन होतच नाही आणि हा महिना गेला तर पुढील महिन्यापासून पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी तयार चटणी खरेदीवर भर दिला आहे . त्यातच मिरचीचा दर वाढल्याने चटणीचा निकटपणा कमी आल्याचे महिलांवर्गातून बोलण्यात येत आहे .
प्रतिक्रिया ....
ज्यावेळी चटणी करायची होती . त्यावेळी जिल्ह्यात लॉक डाऊन स्थिती होती . त्यामुळे मिरची खरेदीसाठी वेळ मिळाला नाही आणि आता मिरची खरेदी करून चटणी होत नाही . त्यामुळे यंदा तयार चटणीवर वर्ष जाणार आहे .
सौ . कमल पाटील , गृहिणी
कंदलगाव .
No comments:
Post a Comment