*मो.युसूफ पुंजानी मित्र मंडळाचा उपक्रम*
प्रतिनिधी । कारंजा (लाड)(m आरिफ़ पोपटे )
कोरोना या विषाणुने संपुर्ण देशात हाहाकार मांडला असुन उपाययोजना म्हणुन देशभर 'लॉक डाऊन' सुरू आहे.त्यामुळे घरदार सोडुन रोजी-रोटी साठी देशभर गेलेले नागरिक आपल्या घरी परतत आहे.रस्त्या रस्त्यावर लोकांच्या झुंड दिसत आहे.लोक
उपाशी पोटी पायी जाताना दिसत आहेत गोरगरिबांना पायी जात असल्याची माहिती काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी यांना मिळाली आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत या सर्व पायी जाणाऱ्या लोकांना स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी म्हणुन मागील १५ दिवसांपासून अविरत पाणी,चहा व बिस्किट वाटप सुरू आहे. यावेळी दिवसभरात १००० बिस्किट पुढ्यांचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी वाटप करतांना काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष हमीद शेख,नगरसेवक सैय्यद मुजाहिद,नगरसेवक राऊफ खान, शिक्षण सभापती जाकीर शेख, नगरसेवक अ. एजाज अ. मन्नान, युनूस पहेलवान,ज्येष्ठ कार्यकर्ते उस्मान खान,मुजाहिद खान,कादर खान,पत्रकार आरिफ पोपटे,युसूफ बाबू साहब, हाजी समी सर,वाहिद शेख,राजू भाई, अजहर भाई आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment