Monday, 18 May 2020

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना इतर जिल्ह्यात परसेवेवर नियुक्ती देऊ नये ह्या मागणी साठी खासदार डॉ. हिना गावित यांचे निवेदन

                                                                                                
नंदुरबार (प्रतिनिधी वैभव करवंदकर)  ------          नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून कुपोषित जिल्हा आहे. सध्याचे corona19 या जागतिक महामारी चा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील इतर गावी  शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, रोजगारासाठी गेलेले कामगार व मजूर तसेच इतर कामांसाठी गेलेले सुमारे 50 हजार नागरिक सध्या जिल्ह्यात परतलेले आहेत त्यांचे आरोग्य तपासणी करणे, त्यांचे विलगीकरण करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे अशातच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुमारे 40 टक्के पदे रिक्त आहेत त्यामुळे सध्याच्या यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त भार देखील पडत आहे. अशा परिस्थितीत या यंत्रणेतील कुठल्याही अधिकारी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना इतर जिल्ह्यात परसेवेवर नियुक्ती देऊ नये अशी अत्यंत महत्वपूर्ण मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश  टोपे यांच्याकडे आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना ताई गावित यांनी केली आहे.  याच मागणीचे निवेदन खासदार डॉक्टर हिना ताई गावित यांनी जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे. त्यांच्यासोबत शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश  पाडवी, हे देखील होते.

No comments:

Post a Comment