कोल्हापूर प्रतिनिधी . दि. 18 एप्रिल
कोल्हापूर शहर व हायवेला जोडणार्या बावडा शिये रॊडलगत हनुमाननगर येथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरती गावातील लोकांनी दैनंदिन जीवनातील सर्व कचरा टाकून रस्त्यालगत दुर्गंधी निर्माण केली आहे. सद्यस्तिथीला रस्त्यावरती प्लास्टिकचे ढीग दिसून येत आहेत. जवळच एम.आय.डी.सी. चा परिसर असल्यामुळे या रस्त्यावरती पुष्कळ वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे हा कचरा लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करत आहे. . त्यामुळे कोरोनाच्या या महामारीमध्ये एखादा दुसराच आजार पसरविण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कचऱ्यामध्ये गाईंचा व कुत्रांचा वावर वाढून हे प्राणी तो कचरा रस्त्यावरती आणत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाने याची वेळेत दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
नदीकडील येणार्या वार्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्याच्या दुर्गंधीचा वास येवून त्रास होत आहे. प्लॅस्टिक बंदी असून सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पडत आहे. रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे ते खाऊन त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment