Friday, 15 May 2020

समरजीत पाटील चे यश

समरजीत पाटील चे यश 
प्रतिनिधी - प्रकाश पाटील ,
      कोल्हापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर  शाळेतील समरजीत शिवाजी पाटील या इयत्ता दुसरी मधील विद्यार्थीने स्पेक्ट्रम परीक्षेत केंद्रात पहिला क्रमांक ,समृद्धी प्रज्ञा परीक्षेत केंद्रात  प्रथम क्रमांक , टॅलेंट प्लस परीक्षेत शहरात प्रथम क्रमांक ,
महाराष्ट्र स्टेट टॅलेंट सर्च परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवित ,के टी एस परीक्षेत शंभर पैकी 100 गुण मिळवत शहरात प्रथम क्रमांक मिळवला. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमुळे जरग विद्यामंदिर चा नावलौकिक वाढला असल्याचे पालक वर्गातून बोलण्यात येत आहे .
  त्याला वर्गशिक्षिका सौ. शैलजा पाटील यांचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गुरव व उपमुख्याध्यापक  शिवाजी पाटील यांची प्रेरणा मिळाली .

No comments:

Post a Comment