Thursday, 14 May 2020

बाहेरुन आलेल्या लोकांची माहिती कळवा - मनपाचे आवाहन - तुमची माहिती गोपनीय राहणार

कोल्हापूर प्रतिनिधी 
कोल्हापूर महानगरपालिके मार्फत कोल्हापूर शहरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात या करिता कोल्हापूर शहरात बाहेर गावाहून येणारे सर्व नागरिक यांची माहिती मिळणे आवश्यक आहे.
याकरिता कोल्हापूर महानगरपालिका कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना कक्ष( वॉर रूम) मार्फत कोल्हापूर शहरातील नागरिकांकरिता एक फॉर्म बनविण्यात आला असून या मार्फत कोणताही नागरिक आपल्या आजूबाजूला किंवा नजीकच्या रहिवासी क्षेत्रामध्ये कोरोना बाधित क्षेत्रातून, परराज्यातून अथवा इतर शहरातून कोणी व्यक्ती / कुटुंबे दि. २५/०४/२०२० नंतर राहण्यास आलेली असल्यास कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणेस त्वरित कळवू शकतात.
याकरिता पुढील लिंक ओपन करून त्यात माहिती भरावी. आपण दिलेली सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
तरी आपण सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
आपल्या घरीच राहावे व ही लढाई लढण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा.

No comments:

Post a Comment