Thursday, 28 May 2020

२६ मेपासून बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार


वाशिम, प्रतिनिधि (m आरिफ पोपटे ) २३ में:

      जिल्ह्यात लॉकडाऊनचे सुधारित नियम लागू करण्यात आले असून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून २६ मे २०२० पासून जिल्ह्यातील बँक कामकाजाचा कालावधी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यास जिल्हाधिकारी हृषीकेश  मोडक यांनी मंजुरी दिली आहे.


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनच्या सुधारित नियमानुसार सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्या वेळत बदल करण्यात आला आहे. राज्यस्तरीय बँक सल्लागार समितीच्या सूचनेनुसार बँक कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्याच्या जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी मंजुरी दिली असून २६ मेपासून जिल्ह्यातील सर्व बँका आता सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 

No comments:

Post a Comment