पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील श्री विठ्ठल बिरदेव येथे सालाबादप्रमाणे साजरा होणारा बिरदेव जन्मकाळ महोत्सव व त्यानिमित्ताने साजरे होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.. जगभरातील सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सोमवार दि.११-५-२०२० रोजी होणारा श्री बिरदेव जन्म काळ सोहळा रद्द करण्यात आला आहे.तसेच हरीनाम सप्ताह,प्रवचन,किर्तन,काकड आरती,हरीपाठ, दररोजचे अन्नदान व महाप्रसाद असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.असे समस्त पुजारी धनगर समाज , प्रमुख मानकरी व पंच कमिटी यांचे वतीने सांगण्यात येत आहे. यावर्षी दि.११-५-२०२० रोजी सकाळी ठिक ७-००वाजता सर्व भाविक भक्तांनी आप आपल्या घरी फोटो अथवा ग्रंथ यावर फुले टाकून श्री बिरदेव जन्म काळ सोहळा साजरा करण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment