*वाशीम जिल्हा प्रशासनाचे सावध पाऊल : ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश*
*दारु दुकाने तुर्तास बंदच : वैद्यकिय सेवा व औषधी दुकानांना २४ तास परवानगी*
*अत्यावश्यक दुकाने, आस्थापना व पेट्रोलपंपासाठी सकाळी ८ ते दुपारी २ ची वेळ*
*केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, चहा टपर्या, पानटपर्या, उपहारगृहे व धाबे यांनाही मनाई*
*दारु सोडून इतर ऑनलाईन सेवा व घरपोच डिलेव्हरीला परवानगी*
*खाजगी व सरकारी कर्मचार्यांना पासेस व आरोग्यसेतु अॅपचा वापर बंधनकारक*
रजनिकांत वानखडे
वाशिम प्रतिनिधी
*वाशीम* - एकीकडे एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नसल्यामुळे ग्रीन झोनमध्ये आलेल्या वाशीम जिल्हा प्रशासनाच्या कौतूकास्पद कार्याची महती थेट गल्ली ते दिल्लीपर्यत गेली असतांना दुसरीकडे स्थानिक जिल्हा प्रशासनाने सावध पाऊल टाकत जिल्ह्यात लॉकडाऊनची ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी श्री ऋषीकेश मोडक यांनी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, केंद्र शासनाची अधिसूचना तथा महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला अधिन राहून १७ मे पर्यत वाढीव लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर ३ एप्रिल रोजी रात्री उशिरा नव्याने आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या या आदेशानुसार ४ मे पासून १७ मे अशा दोन आठवडे लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यानुसार,
१) सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या रेल्वे प्रवासी वाहतुकीला बंदी राहील. २) परराज्यातून जिल्हयात किंवा जिल्हयातून परराज्यात प्रवासी वाहतुकीला अधिकृत परवानगीशिवाय पुर्णपणे बंदी राहील. ३) रिक्षा व बसेससह सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहतुक पुर्णपणे बंद राहील. ४) सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस बंद राहतील. ५) आरोग्य, गृहखाते व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी वगळता इतर सर्व व्यक्तींसाठी आदरातिथ्याची सेवा पुर्णपणे बंद राहील. हा नियम अडकलेले व्यक्ती, प्रवासी व पर्यटकांसाठी लागु राहणार नाहीत. ६) सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, असेंब्ली हॉल पुर्णपणे बंद राहतील. ७) सर्व सामाजीक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे यावर पुर्णपणे बंदी राहील. ८) सर्व धार्मिक व प्रार्थनेची स्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. ९) केश कर्तनालय (सलुन), ब्युटीपार्लर, चहा टपर्या, पानटपर्या, उपहारगृहे व धाबे पुर्णपणे बंद राहतील. १०) दारुची दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. तोपर्यत सद्यस्थितीत दारुची विक्री करणारे दुकाने बंद राहतील.
सुट दिलेली दुकाने व आस्थापना प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार सुरु राहतील. यामध्ये सोशल डिस्टेंस, मास्क, वैयक्तीक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर, दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्कीग करणे संबंधीत दुकान मालकास बंधनकारक राहील. याशिवाय दुकानांमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्ती असता कामा नये.
दुकाने/आस्थापना, पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहतील. कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यत डिझेल उपलब्ध राहील. निर्बंधातुन सुट दिलेल्या दुकाने व आस्थापनांच्या कर्मचार्यांना पासेस बंधनकारक असून वाशीम शहराबाबत या पासेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तर तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदारांना अधिकार देण्यात आले आहेत.
एमआयडीसी व इतर भागातील उद्योगधंदे सकाळी ७ ते रात्री ७ पर्यत सुरु ठेवता येतील परंतु या उद्योगाच्या ठिकाणी कार्यरत कर्मचार्यांना पासेस बंधनकारक राहतील. वाशीम शहराबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तर इतर ठिकाणी तालुक्याच्या तहसिलदारांना पासेस निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दारु सोडून इतर कोणत्याही वस्तु व सेवांसाठी ऑनलाईनला मुभा व घरपोच डिलेव्हरी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत परवानगी असेल. परंतु यासाठी पासेस बंधनकारक राहील. कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी सेवा केंद्रे, गॅस एजन्सी, इमारतीची बांधकामे सकाळी ८ ते सायंकाळी ६ अशा वेळेत सुरु राहतील. परंतु संबंधीत मजुरांना व ठेकेदाराला पासेस काढणे बंधनकारक राहतील.
सर्व बँका सकाळी ८ ते दुपारी २ पर्यत सुरु राहतील. अंत्यविधीसाठी सामाजीक अंतर व मास्कसह जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी असेल. वैद्यकिय सेवा व मेडीकल दुकाने २४ तास सुरु राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय व बँक कर्मचार्यांना आरोग्य सेतु अॅप वापरणे बंधनकारक राहील. याशिवाय भविष्यात जिल्हयातील कोणत्याही भागात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यास तो भाग कन्टोनमेंट झोन घोषीत करुन या भागासाठी सर्व तरतुदी रद्द करण्यात येतील. व जोखमीच्या आधारावर त्या भागासाठी वेगळा झोन पाडण्यात येईल. या आदेशाचे उल्लंघन करणार्याविरुध्द महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी श्री मोडक यांनी नव्याने काढलेल्या या सुचनेव्दारे दिले आहेत.
No comments:
Post a Comment