Saturday, 2 May 2020

पत्रकार शिक्षकाची लॉकडाऊनमध्ये जपली सामाजिक बांधिलकी - लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीचे विनोद पाटील हे श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे 1991 पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते पत्रकारिता ही करतात. शिक्षक आणि पत्रकार या पेशात बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या लग्नानाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून दोन हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी दिली आहे.
         
फोटो - कुटुंबिय मागिल वर्षी जोतिबा दर्शन घेतलेनंतर 
  
विनोद पाटील यांचे लग्न 2 मे 1999 साली झाले तेव्हा पासून दरवर्षी ते न चुकता श्री जोतिबा येथे सहकुटुंब जाऊन दर्शन घेतात पण यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. म्हणून सर्व कुटुंबाने लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत फुल ना फुलाची पाकळी राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अॉनलाईन द्वारे देणगी दिली आहे. सर्व कुटुंबाला याचा सार्थ अभिमान असून या सामाजिक बांधिलकीचे आदर्श समाजातील सर्व घटकांना अनुकरणीय आहे. 

No comments:

Post a Comment