उदगीरचे राष्ट्रवादी विद्यार्थी नेते युवराज कांडगिरे यांच्या मागणीला यश:-
आज जगभरात चाललेल्या नोवेल कोरोना व्हायरस (कोविड-19) या संसर्ग जन्य रोगामुळे आज महाराष्ट्र व देशात भयाण परिस्थिती झाली आहे, या रोगाची गती कमी करण्यासाठी आपण लॉकडाउन हा पर्याय केला आहे,पण महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता अस दिसून येत आहे की,परिस्थिती बरी व्हायला वेळ लागेल त्यात महाविद्यालये ,शाळा सर्वकाही बंद आहेत.व यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,आणि त्यात महाविद्यालयीन परीक्षा घ्याचा निर्णय घेतला तर येणाऱ्या अडचणी खालील अडचणी असतील.
1)अनेक विद्यार्थी आज आपलं राहते गाव,सोडून पुणे,मुंबई,लातूर यासारख्या शहरात राहतात ,लॉकडाउन मुळे सर्व विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी आलेले आहेत, पण त्यानी अभ्यासाची कोणतीही सामग्री त्यांच्या सोबत आणलेले नाही,अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करायला अडचण होईल.
2) काही महाविद्यालयाने ऑनलाइन शिकवणी चालू केलेली आहे ,पण अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत.अनेक जणांच्या गावामध्ये नेटवर्क चे प्रोबेल्म आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास ला अडचण येत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पदवीच्या केवळ अंतिम वर्षांचीच परीक्षा होणार आहे असं मा.उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मा.मुख्यमंत्री साहेबांनी परिक्षेचा निर्णय जाहीर करावा ही आपणांस नम्र विनंती.जर सर्वच बॅकलॉक आणि रेग्युलर विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्यात अडचण नसेल तर,तसा निर्णय आपण लवकर जाहीर करावा अशी विनंती ,विद्यार्थी नेते युवराज कांडगिरे यांनी मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल द्वारे करण्यात आली होती.
ही मागणी काल केली होती.
आज दुपारी यश आल धन्यवाद मुख्यमंत्री साहेब , उदयजी सामंत साहेब आणि अमितभैया देशमुख साहेब ,संजयजी बनसोडे साहेब, भरतभाऊ चामले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खाली हे पत्र पाठवण्यात आले होते व त्याचे यश मिळाले.
No comments:
Post a Comment