पट्टणकोडोली : (साईनाथ आवटे) पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड प्रमाणात गर्दी....कामगारांची द्विधा मनस्थिती
सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे पण या मध्ये परराज्यातील नागरिकांना आपल्या गावी जाण्यास सवलत देण्यात आली आहे. पण त्यासाठी परवानगी अर्ज करताना फिटनेस वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र प्राथमिक आरोग्य केंद्रात ही मिळते. त्यामुळे पट्टणकोडोली गावापासून जवळच असलेल्या कागल एमआयडीसी मधील बहुतांशी परप्रांतीय कामगारांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घेत या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेने सोशल डिस्टंसिंग चा फज्जा च उडाल्याचे चित्र आज दिसले. पहाटे पाच वाजलेपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात व परिसरात अचानक झालेल्या या गर्दीने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील काही तरुणांनी त्या ठिकाणी धाव घेतली व संबधीत सर्वाना हाकलून दिलेचे समजते सरकारच्या वतीने जाहीर केले प्रमाणे आपापल्या घरी जाण्यासाठी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ची धडपड व गावामध्ये सोशल डिस्टंसिंग चा फज्जा मोडू नये यासाठी गावातील नागरीकांचा विरोध या अनोख्या पेचामध्ये हे कामगार आडकले ल्या अवस्थेत दिसत होते.
No comments:
Post a Comment