Sunday, 10 May 2020

सुटकेचा नि:श्‍वास : कारंजात आनंदाचे वातावण डॉक्टर , त्यांची टिम व त्या रुग्णाचे नातेवाईक सर्वांचा रिपोर्ट निगेटीव्ह जिल्ह्यातून पाठविलेले १३ ही रिपोर्ट निगेटिव्ह : जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती वाशिम जिल्हा अजूनही ग्रिन झोन मध्येच

सुटकेचा नि:श्‍वास : 
कारंजात आनंदाचे वातावण डॉक्टर , त्यांची टिम व त्या रुग्णाचे नातेवाईक सर्वांचा रिपोर्ट निगेटीव्ह 
जिल्ह्यातून पाठविलेले १३ ही रिपोर्ट निगेटिव्ह : जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती 
वाशिम जिल्हा अजूनही ग्रिन झोन मध्येच 

     वाशिम  (m आरिफ़ पोपटे )दि.१० -
 काल दिनांक ०९ रोजी कारंजा येथील डॉक्टर व त्यांचे टिम सह नेर येथील शिक्षक रुग्णाचे नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट आज रोजी निल आल्यामुळे संपूर्ण कारंजा शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच एकूण १३ ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संपूर्ण वाशिम जिल्हा हा अद्यापही ग्रिन झोन मध्येच आहे, हे विशेष. 
 याबाबत जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सव डॉ.सोनटक्के यांनी ही माहिती दिली आहे. 
 सर्व लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह यावेत यासाठी कारंजातील सर्व धर्मीय बांधवांनी देवांना जणू साकळेच घातले होते. विविध माध्यमांतून व सोशियल मिडीयातून हिंदू, मुस्लिम, शिख बांधवांनी कारंजातील या सर्वांचे रिपोर्टच निगेटिव्ह यावेत यासाठी प्रार्थना व सदिच्छा सुरु केल्या होत्या. त्या फळाला आल्या असून सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने कारंजासह संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे.

No comments:

Post a Comment