Sunday, 10 May 2020

धानोरा सिलिंग पॉईंट वर सामाजिक अंतर पाळत विवाह संपन्न

धानोरा सिलिंग पॉईंट वर सामाजिक अंतर पाळत विवाह संपन्न      
प्रतिनिधी: प्रमोद झिले येरला हिंगणघाट                   

 येरला :- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस महामारी घोषित केल्याने संपूर्ण देशात, महाराष्ट्रात व वर्धा जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सतत वाढत असल्याने पोलीस स्टेशन वडणेर हद्दसीमेला यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर वर पोलीस स्टेशन वडणेर येथील कर्तव्य दक्ष पोलीस स्टाफ नेमण्यात आला असून पोलीस स्टाफ रात्र दिवस आपले कर्तव्य योग्य रित्या पार पाडत आहे. दि.09/05/2020 रोजी संजय रामदास झाडे रा. सिंदोला,जी.चंद्रपुर, शुभांगी गजानन कोल्हे रा. येरला जी.वर्धा यांचे शुभविवाह करण्याचे आयोजित असल्याने वर- वधुनी संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करून चंद्रपूर - वर्धा सिमेलगत धानोरा सिलिंग पॉईंट वर पोलीस स्टेशन वडणेर येथील पोलीस स्टाफ राजेंद्र झाडे, अंकुश निचत, प्रवीण सदावर्ते, येरला येथील वधूपिता गजानन कोल्हे,दिलीप देऊळकर,मेघश्याम झिले व  धानोरा येथील सागर बोन्द्रे, रोशन उमाटे या  ग्रामस्थाच्या  उपस्थितीत विवाह संपन्न करण्यात आला.

No comments:

Post a Comment