Sunday, 10 May 2020

पट्टणकोडोली येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 कोल्हापूर प्रतिनिधी -  कोरोना संकटात लॉकडाऊन असल्याने गोरगरीब जनतेला दिलासा म्हणून पट्टणकोडोली येथे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. 
जिल्हा परिषद सदस्य व समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारे अशोकराव माने (बापू) यांच्या कडुन पट्टणकोडोली मध्ये आशा सेविका तसेच  हातावरील पोट असणाऱ्या गरजू 100 लोकांना जीवनावश्यक असणारे अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले . यावेळी पट्टण कोडोली मधील परशराम डावरे, प्रदिप मिरजकर,सचिन पणदे,नंदकुमार किर्तीकर,विठ्ठल अंगारे,लुळशिदास लुमनाक,सुहास तोडकर,विकास बिरांजे,गुंडुराव वड्डर व भाजपचे सर्व पदाधिकारि व कार्येकर्ते उपस्थित होते.

1 comment:

  1. अभिनंदन.
    भावी कार्यास शुभेच्छा

    ReplyDelete