Sunday, 10 May 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावस्तरावर कामे सुरू करण्यात यावीत जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावस्तरावर कामे सुरू करण्यात यावीत
  जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

covid-19 या विषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक  दिवसांपासून लॉकडाऊन ची गंभीर  परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे. 
सध्या आपत्ती आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजूर,गोरगरीब जनता, कर्मचारी यांना आपल्या गावाकडे येण्याची परवानगी मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेली असून सध्या *राज्यातून व इतर जिल्ह्यातून मजूर वर्ग खूप मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात आला आहे*. 
 त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सध्या उद्भवला असून त्यांना कामाची आवश्यकता भासत आहे तरी या परिस्थितीचा रोहयोमंत्री म्हणून आपण विचार करून आपल्या विभागाअंतर्गत लातूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेत रस्ते, गावांतर्गत रस्ते,व शिव रस्ते अशी कामे ग्रामपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात घेण्याबाबत आपल्या स्तरावरून स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री मा.संदिपानजी भुमरे  व रोजगार हमी योजना राज्यमंत्री मा. संजय बनसोडे  यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment