Sunday, 3 May 2020

जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुन दयावी व तपासणीची गती वाढवा

जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुन दयावी व तपासणीची  गती  वाढवा
 
जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या कडे पत्राद्वारे केली मागणी

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे  

संपूर्ण देशभरात 25 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता आपल्या जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत अर्ज करून परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे  लातूर जिल्ह्यात जेवढे  नागरिक येतील त्या सर्वांचेच नमुने घेणे आवश्यक वाटते याकरिता सर्व नमुने घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यात सध्या फक्त अहमदपूर ,उदगीर ,निलंगा, लातूर या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत तर या सुविधा वाढवून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी सर्व नमुने घेण्याची यंत्रसामग्री व प्रयोगशाळा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मा. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यासोबतच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना यापूर्वी 14 दिवस क्वारंटाईन  केले जायचे परंतु सध्या फक्त पाच दिवस शाळेत व उर्वरित नऊ दिवस घरी क्वारंटाईन करण्याबाबत पत्र मिळाल्याचे कळते. 
 हे अतिशय धोकादायक आहे त्यांना 14 दिवस विशिष्ट ठिकाणी क्वारंटाईन करण्यात यावे.
बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे परंतु काही लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ते हा दंड भरू शकत नाहीत तरी या दंडाच्या रकमेबाबत पुनर्विचार करावा.
काही तालुक्यांमध्ये तालुका दंडाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये समन्वय दिसून येत नाही त्यामुळे काही तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे,
सध्या आरोग्य विभागावर खूप मोठा कामाचा ताण असल्यामुळे त्यांना समजून घेऊन धीर देणे महत्त्वाचे वाटते जेणेकरून ते आणखी जोमाने काम करतील.
लातूर जिल्ह्याची हद्दबंदी आणखीन मजबूत करणे आवश्यक वाटते, जेणेकरून बाहेरील व्यक्ती आपल्या जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करणार नाहीत.
जिल्ह्याबाहेरील परवानगी घेऊन लातूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व लोकांच्या swab चे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन  करण्यात यावे.
उदगीरच्या जनतेसाठी  मोठयाप्रमाणात तपासन्या करण्यासाठी मनुष्यबळ व तपासणीकेंद्राची मोठयाप्रमाणात सुविधा ऊपलब्ध करुण दयावेत.ऊदगीर शहरात बरेच  कोरोना  संशयित रुग्ण असू  शकतात. या करिता  कोराना महामारीपासुन जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठयाप्रमाणावर तपासण्या होण्याची आवश्यकता आहे.यासाठी मोठयाप्रमिणावर मनूष्यबळ व तपासणीकेंद्राच्या सोईसुविधा उपलब्ध करुन दयावेत.

No comments:

Post a Comment