Sunday, 3 May 2020

राज्य सरकारने एकदाच काय ते चाकरमान्यांबाबत धोरण जाहीर करावे - आ.नितेश राणे

प्रतिनिधी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अडकलेल्या लोकांना कोकणात पाठवायचे का नाही याबद्दल आमदार नितेश राणे यांनी ट्विटर वर एक ट्विट केले आहे. 
राज्य सरकारनी एकदाच काय ते मुंबई मध्ये राहणारे चाकरमानी यांच्याबाबत धोरण जाहीर करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म कधी नावं मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावागावांत भांडणे सुरु झाली आहेत. सरकारनी उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे.
राज्यात बर्‍याच जिल्ह्यात अशाच प्रकारे गोंधळाची परिस्थिती आहे. बाहेरून येणाऱ्या आणि परराज्यात जाणार्‍या लोकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. अॉनलाईन फॉर्म भरायला सांगितले जात आहेत पण बर्‍याच अंगठेबहाद्दूर लोकांना फॉर्म भरता येत नाही. कोणी राज्य पातळीवरील फॉर्म भरायला सांगतात तर कोणी जिल्हा पातळीवर त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

No comments:

Post a Comment