Friday, 15 May 2020

सैनिक टाकळी परिसरात खरिपपूर्व मशागतीला वेग

सैनिक टाकळी प्रतिनिधी 
सैनिक टाकळी व परिसरामध्ये खरीपपुर्व मशागतीला वेग आला आहे कोरोनाव्हायरस पार्श्वभूमीवरती सर्वत्र लॉकडॉऊन असल्याकारणाने यावर्षी मशागत वेळेत पूर्ण होते का नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते परंतु शेतीकामाला यातून सूट दिल्यामुळे सध्या शेती मशागतीच्या कामाला गती मिळाली आहे या परिसरामध्ये मे अखेरीस सोयाबीन लागवड केली जाते परंतु मागील काही वर्षांपासून अनियमित पाऊस पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे पाठ फिरवली आहे. सध्या आडसाली ऊस लागणीसाठी सऱ्या पाडणे ,ऊस भरणीचे काम  युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या भागामध्ये वळीव पावसाने दोन ,तीन वेळा हजेरी लावल्याने हा पाऊस  मशागतीसाठी उपयुक्त ठरला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची पुढील हंगामासाठी लगबग सुरू झालेली आहे.

No comments:

Post a Comment