प्राचार्य लाभे यांच्या पुत्राचा झाला आदर्श विवाह
प्रतिनिधी : प्रमोद झिले हिंगणघाट,वर्धा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगदी शासन-प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत अवघ्या पंधरा व्यक्तींच्या उपस्थितीत देवळी तालुक्यातील वाबगाव येथील लाभे व समुद्रपुर तालुक्यातील सावंगी (वडगाव) येथिल पोफारे कुटुंबियांच्या मुला-मुलीचा विवाह सोहळा आज 15 मे रोजी अगदी सध्या पद्धतीने पार पडला, वर पिता प्राचार्य श्रीधरराव लाभे हे कृषि उत्तपन्न बाजार समिती पुलगाव चे संचालक असून देवळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुद्धा आहेत, त्यामुळे मुलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटात होणार हे निश्चित होते, त्याची पूर्व तयारी म्हणून हिंगणघाट येथिलच नामांकित मंगल कार्यालयाचे बुकिंग सुद्धा करण्यात आले, देशात कोरोना व्हायरस ने शिरकाव केला, त्यामुळे प्रचार्य लाभे यांनी मुलाचा विवाह अगदी सध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेवून या विवाह सोहळ्यातील रक्कमेतून गोरगरीबांना धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, हा उपक्रम इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरला आहे.
पैशांची उधळण करीत थाटात विवाह सोहळा पार पडण्याची परंपराच रूढ झाली आहे. प्रसंगी विवाह सोहळ्यासाठी वधु पित्या कडून कर्जांचा डोंगर उचलला जातो. कोरोनाच्या सावटातही काहींनी विवाह सोहळा लांबणीवर टाकला आहे. मात्र, वाबगांव येथील नीलेश श्रीधरराव लाभे व सावंगी येथिल शिवानी राजेंद्र पोफारे यांचा आदर्श विवाह आज 15 मे रोजी परिवारातील अवघ्या 10 सदस्यांच्या उपस्थिती सोशियल डिस्टन्स ठेवून वधु चे घरीच पार पडला, या विवाह सोहळ्याला सावंगी(मिर्जापुर) चे सरपंच सुभाष महैस्कर, ग्रामसेवक स्नेहा पाटिल, ग्रा.पं.सदस्य येलमूले,सविता कन्हाळकर, ग्राम पंचायत कर्मचारी बालू सातपुते, मनीष खडसे, आंगनवाड़ी सेविका देवकु नवघरे, पत्रकार डॉ.संदिप लोंढे व प्रशांत पोफारे यांची उपस्थिती होती. वाबगाव येथून मुलाकडील अवघे पाच जण प्रशासनाची परवानगी घेऊन सावंगी येथे आले होते. विवाह सोहळा उरकल्यानंतर वर पक्षा कडून विवाहाच्या रक्कमेतून संकटात सापडलेल्या गरजवंतांना धान्य वाटपाचा आदर्शवत निर्णय घेतला. त्यामुळे नीलेश व शिवानी लाभे या नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांचा आदर्श, समाजाला आदर्श देणारा ठरला आहे.
No comments:
Post a Comment