Tuesday, 5 May 2020

निगवे खालसा येथे गरजूंना धान्याचे वाटप

निगवे खालसा येथे गरजूंना धान्याचे वाटप

निगवे खालसा : प्रतिनिधी :- 
निगवे खालसा येथील आपत्ती व्यवस्थापन कमिटी तील कार्यकर्त्यांनी गावातील गरीब गरजूंना धान्याचे मोफत वाटप केले आहे.
     आपत्ती व्यवस्थापन कमिटी तील प्रमुख कार्यकर्ते संतोष सुतार, तुषार पाटील, मेघराज पाटील, संदीप पाटील, मच्छिंद्र पाटील, निलेश पाटील, धनाजी पाटील यांनी गावात फिरून ग्रामस्थांना अवाहन करून ३०० किलो तांदूळ जमा केले आणि त्यानंतर गावातील गरीब आणि गरजू अशा ९० जणांना या तांदळाचे वाटप केले. कार्यकर्त्यांनी उत्सफूर्तपणे केलेल्या कार्याबद्दल सर्व थरांमधून ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment