*दुधासाठी तहसीलदारांची एकच धावपळ*
उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
उदगीर पासून सात किलोमीटर अंतरावर तोंडार पाटी येथील समाज कल्याण च्या वस्तीग्रहा मध्ये एक कौरान्टऐन सेंटर असून या केंद्रांमध्ये जवळपास नव्वद जणांना ठेवण्यात आले आहे.यापैकी नव्वद जण सुद्धा उदगीर शहरातील विविध नगरातील व परिसरातील आहेत या सर्वांची विचारपूस करण्यासाठी उदगीर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे त्या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी तीन ते पाच वर्षाखालील लहान मुले रडत असताना त्यांच्या लक्षात आले.हे का रडत आहे यांची विचारपूस त्यांनी केली असता हे मुले दुधासाठी रडत आहेत असे त्यांच्या पालकाकडून त्यांना सांगण्यात आल्यानंतर स्वतः तहसीलदार साहेबांनी हातात बाटली घेऊन तोंडार पाटी परिसरातील बसलेल्या वस्त्यामध्ये त्यांनी दुधाचा शोध घेऊ लागले.माणुसकी जपण्यासाठी दुधासाठी वणवण उन्हात भटकंती केली.
त्या माळरानावर दूध उपलब्ध होत नसल्याने तेव्हा तहसीलदार मुंडे साहेबांनी आपल्या सोबत मंडळाधिकारी शंकर जाधव तलाठी गुंडरे यांनी लोणी गावातील रहिवाशी बंडू पाटील यांच्याशी संपर्क साधून दोन लिटर दूध लोणी गावामध्ये जाऊन गरम करून घेऊन आले अशी माणुसकी तहसीलदार यांची बघून दुधासाठी रडणाऱ्या लेकराला दूध देताच त्या लेकराच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्या मातेने दुरुनच हात जोडून तहसीलदार यांना नमन केले असे माणुसकी जपणारे तहसीलदार व्यंकटेश मुंडे उदगीरकरांना लाभल्यामुळे उदगीर करांचे नशीबच म्हणावे लागेल असी चर्चा उदगीर नगरीत ऐकायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment