Tuesday, 5 May 2020

पित्रत्व हरवलेल्या निराधार मुलीनां ओम साई मंडळाचा आधार.

पित्रत्व हरवलेल्या  निराधार मुलीनां ओम साई मंडळाचा आधार. 
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील ओम साई सेवा भावी मित्र मंडळ ने पित्रत्व हरवलेल्या दोन मुलींना त्यांचा विवाहासाठी प्रयेकी ११०००/ रू ची आर्थिक मदत देऊन पित्रत्व हरवलेल्या निराधार मुलींना आधार देण्याचे सामाजिक कार्य या मंडळाने  केले आहे.
सध्या देशात लॉक डाउन असल्याने अनेक नागरिक आपली उपजीविका मोलमजुरी करून  भगवण्याचा प्रयत्न करणारे अस्या सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना आज उपासमारीची वेळ आली आहे, अनेकांचा हाताला काम नाही, अनेक लोक आपल्या कामापासून वंचित असल्याने, अनेकांचा मुली चे विवाह हे आर्थिक अडचणी व लाॅकडाऊन  मुळे होत नसल्याने ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न कुटुंबातील सदस्य करत असल्याचे वास्तव ग्रामीण भागात दिसून येत आहे, हीच परिस्थिती पाहून तोंडार येथील ओम साई सेवा भावी मित्र मंडळ च्या  वतीने मंडळाचे सचिव कैलास खिंडे,व दसरथ पांडे यांचा वाढदिवसानिमित्त गावातील कु.स्वामी शुभांगी संजय या मुलीच्या  शिक्षणासाठी,व कु.शेटे रोहिनी बबन या मुलींचे आपल्या पित्याचे छत्र हरवलेल्या  मुलीचा वैवाहीक संसार आर्थिक परिस्थिती मुळे घोंगावत होता,त्याना ही  मंडळाच्या वतीने  दि:५/५/२० रोजी मंडळाचे संस्थापक  अध्यक्ष शिवकुमार दादा पांडे यांचा हस्ते या दोन मुलींचा भविष्यासाठी या कौटुंबीक, वैवाहीक जिवनासाठी प्रत्येकी ११,०००/₹ ची मदत मुलीचा आई कडे सुपुर्द करण्यात आले, व गत वर्षी या दोन मंडळाच्या सदस्यांचा  वाढदिवशी गावातील मुख्य रस्त्यावर नैसर्गिक समतोल राखत व्रक्षारोपन करण्यात आले होते, याची जोपासना मंडळाचा वतिने दर आठ दिवसाला टँकरने पाणी पुरवठा करून  वृक्ष संगोपन करत आहेत तसेच वृक्षा चा ही  पहिला वाढदिवस पुष्पहार घालुन साजरा करण्यात आला, या वेळी जेष्ठ नागरिक गणपत कंठे, बस्वराज पांडे(बाबा)मंडळाचे उपाध्यक्ष विरभद्र बिरादार (भैया) शिवलिंग अप्पा नांवदे, निळकंठ बिरादार, संग्राम भिंगोले, माधव वाघंबर पांडे, रामेश्वर बिरादार ,गोविंद पांडे बबन होणराव गायत्री हॉटेल चे मालक सुनिल मेंगा ,संदिप आंबेशत, नंदय्या स्वामी ई सह गावातील नागरिक उपस्थित होते. सदर मंडळ हे गावातील असे अनेक गरजू विद्यार्थी यांच्या ही मदतीला धावून येते  या उत्क्रष्ठ कार्याबद्दल मंडळाचे कौतुक ग्रामस्थांच्या वतीने  होत आहे.

No comments:

Post a Comment