Saturday, 16 May 2020

दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वाटप

*
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
कोरोना विषाणू  कोविड 19 या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचार बंदीची घोषणा केली आहे.
 सदरच्या संचारबंदी च्या काळामध्ये दिव्यांग व्यक्तींची उपासमार होऊ नये म्हणून समाज कल्याण विभाग,  जिल्हा परिषद  लातूर  तर्फे जिल्ह्यातील ग्रामीण  भागातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा, तोंडार, कौलखेड, जानापूर, शिरोळ, धडकनाळ आदी  गावामध्ये  जाऊन  दिव्यांग व्यक्तींना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे,जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड,लातूर  जिल्हा परिषद सदस्या विजयाताई बिरादार,उदगीर पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील, समाज कल्याण अधिकारी खमितकर,  ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, , भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंडित सूर्यवंशी सर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित सुकनीकर
 विशाल रंगवाळ, सागर बिराजदार आदींसह पदाधिकारी उपस्थित  होते. 
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले होते. .

No comments:

Post a Comment