Monday, 8 June 2020

लॉकडाऊन काळातील एसटी पासची मुदत वाढवून द्या - अन्यथा तीव्र आंदोलनाचा संभाजी ब्रिगेडचा इशारा


कोल्हापूर. प्रतिनिधी दि.08/06/2020  

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील एसटी सेवा ठप्प होती. पण ज्या लोकांनी संबंधित मासिक पास काढले होते त्यांना मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात  संभाजी ब्रिगेड च्या वतीने विभागीय नियंत्रक यांना निवेदन देऊन एसटी चे विद्यार्थी, कामगार व अन्य पासधारकांना मुदत शिल्लक असलेले पासची मुदत वाढवून देणे बाबत मागणी केली आहे. 

यापूर्वीही 2019 मध्ये आलेल्या महापूर दरम्यान राज्य परिवहन ची वाहतूक सर्व डेपोची सुविधा बंद होती दिनांक 5 /8/ 2019 ते 14 /8 /2019 असे एकूण दहा दिवस आपल्या गाड्या बंद असल्याने प्रवास न केलेल्या सर्व प्रकारच्या पासधारकांना मुदत वाढवून देणे गरजेचे होते तसेच दिनांक 22/ 3 /2020 ते आजपर्यंत जवळपास अडीच महिने संपूर्ण देशभर कोरणा या रोगाच्या साथीमुळे प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद आहे दरम्यान ज्या विद्यार्थी कामगार व अन्य पाच धारकांनी लोक डाऊन च्या आधी पास काढले होते व त्या पासची लॉकडाऊन नंतर जेवढे दिवस मुदत शिल्लक आहे अशा सर्व पासधारकांना लॉकडाऊन संपतात राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सुरू होताच वाढीव मुदतीत प्रवास करता आला पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले. 

 लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य नागरिक कामगार पालक व विद्यार्थी आर्थिक संकटात आहेत तसेच एसटी प्रवासी वाहतूक एसटीनेच बंद केली असल्याने मुदत वाढ करून देणे ही मागणी उचित असून आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा शाळा ,महाविद्यालय सुरू होणार आहेत तत्पूर्वी सर्व पासधारकांना मुदत वाढवून न दिल्यास दिनांक 15/06/ 2020 पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताबडतोब निर्णय घ्यावा तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांना सूचित करावे. पुरकाळातील 10 दिवस आणि लॉकडाऊन नंतर शिल्लक दिवस वाढवून द्यावेत द्यावेत याबाबत सात दिवसात निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थी आणि कामगारांसह आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात येईल असा इशारा रुपेश पाटील जिल्हा अध्यक्ष यांनी दिला. यावेळी सोबत विकी जाधव अभिजीत भोसले निलेश सुतार मदन परिट भगवान कोईगडे अभिजीत कांजर  निवृत्ती कुरणे सुहास चव्हाण नेताजी बुवा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment