कंदलगाव ता .२२ ,
कंदलगाव येथील मारूती मंदिरासाठी जि.प. च्या फंडातून मंदिर नुतनीकरणा साठी ५ लाखाचा निधी मंजूर झाला होता .
मंजूर निधीतून काम सुरु झाले मात्र या कामासाठी हा निधी कमी पडत असल्याने तत्कालीन आमदार फंडातून आणखी ५ लाख मंजूर करू असे आश्वासन आमदारांनी दिले होते .परंतू लॉक डाऊन काळात हा निधी मिळाला नसल्याने मंदिराचे काम अर्धवट राहिले आहे .स्थानिक तरूण मंडळाच्या सदस्यांनी याबाबत वारंवार चौकशी करून ही कोणी दखल घेत नसल्याने पिंपळाकडील तालिम मंडळाच्या भगवान निर्मळ , सचिन संकपाळ , रोहन काटकर , अजित अतिग्रे , सुरेश पाटील , विशाल संकपाळ , प्रदिप कदम या सदस्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे .
कोरोनाकाळात सर्वच निधींना कात्री लागली असून मंदिराच्या उर्वरीत निधीसाठी प्रयत्न करून मंदिर पूर्ण करू .
सौ . अर्चना पाटील , सरपंच
फोटो - कंदलगाव येथील अर्धवट अवस्थेतील मारूती मंदिर
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment