Monday, 22 June 2020

ऑनलाईन शिक्षणाचा हट्ट नको .पालकातून मागणी ..

कंदलगाव ता .२२ ,
   सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असले तरी राज्यातील शाळा , कॉलेज  बंद असून सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे .व हे शिक्षण सुरू करण्यापूर्वी त्यातील त्रुटीकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याने  आता त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.आधीच अडीच महिन्याच्या लॉकडाउन मध्ये अनेकांचे जॉब गेलेत,अनेकांना दररोजच्या दोनवेळच्या जेवणाची मारामारी,काहींच्या घरात आजारपण व इतर अनेक दैनंदिन अडचणी व यातच ज्यांचे हातावर पोट आहे .व जे रोजंदारीवर काम करतात .ते काम नसल्यामुळे आधीच पिडलेले आहेत व  अशातच आता ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने बहुतेकांकडे यासाठी लागणारा अँड्रॉइड स्मार्ट फोन नसल्यामुळे अनेक विधार्थी अशा शिक्षणा पासून वंचितच राहणार व सर्व्हनुसार अजूनही राज्यातील जवळ पास ५० टक्के लोकांकडे स्मार्ट फोन नाहीत .बीड जिल्ह्यात नुकताच एका विधार्थीने पालकांनी स्मार्ट फोन घेऊन न दिल्यामुळे आत्महत्या केली,याला जबाबदार कोण ? 
    यामुळे पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे . दिवसातून दोन तीन तास मोबाईलवर शिक्षण घेत असल्याने डोळ्यांचे तक्रारी व इतर शारीरिक आजार बलवायला सुरवात होतेय,अनेक शाळांनी हा ऑनलाईन चा फंडा सुरू केला आहे .व त्याची पार्श्वभूमी केवळ फी वसूल करणे इतकीच आहे असं दिसतंय.तेव्हा या ऑनलाईनच्या जंजाळातून विधार्थी सुटायला हवेत.केंद्र शासनाच्या माहीती व प्रसारण मंत्रालयाने विधार्थी शिक्षणासाठी स्पेशल वाहिन्या सुरू करणार होते,त्याचे काय झालं ? याबद्दल आता सर्वच गप्प आहेत.तेव्हा विधार्थी हित लक्षात घेता ऑनलाईन शिक्षण ताबडतोब बंद करण्यात यावे अशी मागणी पालकांतून होत आहे .

   - लॉक डाऊन काळात अनेकांना काम नसल्याने आपल्या संसाराचा गाडा चालवणेसाठी मिळेल ते काम करून दैनंदिन गुजारा सुरू आहे . ऑनलाईन शिक्षणासाठी दहा हजाराचा मोबाईल घ्यायचा तरी कसा ?
रामचंद्र कुसाळे , पालक


 - विद्यार्थांच्या हट्टामुळे पालकांना भुर्दंड बसत असून अनेक पालक रोजंदारी , मजूरी तसेच वॉचमन सारखे काम करत असून त्यांच्या कुंटूबाचा रोजचा खर्च चालवणे सुद्धा कठिण आहे .आशावेळी ऑनलाईन शिक्षणासाठी होणारा हट्ट घातक ठरत आहे . 
आर .बी. पाटील , मुख्याध्यापक .

No comments:

Post a Comment