कंदलगाव ता . २१ ,
गावातील काही विघ्नसंतोषी तरुणांकडून जाणून भोजून ग्रामपंचायत कोरोना कमिटी व माजी सैनिकां विषयी सोशल मेडीयातून बदनामी सुरु आहे . त्यामुळे गावात अनेक आफवा पसरल्याने आज दि .२१ रोजी ग्रामपंचायत सैनिक हॉल , गिरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या .
गेल्या तीन महिन्यापासून ग्रामपंचायत सर्व सदस्य , कोरोना कमिटी , माजी सैनिक व तरुण कार्यकर्ते अहोरात्र झटून गावातील नागरीकांना कोरोना पासून दूर ठेवले आहे .
मात्र गावातील काही ग्रुपमधून निव्वळ बदनामी करायची या हेतूने सोशल मेडीयातून खोट्या बातम्या प्रसिद्ध करून गावच्या माजी सैनिक व कोरोना कमिटीची बदनामी सुरू केली आहे . हि बदनामी त्वरीत थांबवावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या बैठकित देण्यात आला . गावातील माजी सैनिक , सरपंच , डे .सरपंच यांनी आपली मते मांडली .
या पत्रकार परिषदेला सरपंच , डे .सरपंच , ग्रा.पं. सर्व सदस्य , माजी सैनिक , कोरोना कमिटी , तरुण मंडळाचे सदस्य , ग्रामसेवक , तलाठी , आरोग्य विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .
फोटो - गिरगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच संध्या पाटील व उपस्थित मान्यवर .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment