Monday, 29 June 2020

कोरोनामुळे सर्वसामान्यवर आर्थिक संकट,वीज बिल माफ करण्याची पुंजानी यांची मागणी


प्रतिनिधी (आरिफ पोपटे )। कारंजा (लाड)


कोविड-१९ या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला व्यापले आहे.कोरोना संक्रमनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण भारतात २१ मार्च पासून लॉक डाऊन लावण्यात आल्यामुळे सर्वसामान्य, गरीब,हातमजुरी करणारे,मजूर,कामगार या सर्व घटकांवर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.गेल्या चार महिन्यापासून कोविड १९ महामारीचे संकट मुख्यतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीत गरीब व सामान्य वर्ग घटकाना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.चार महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.या सर्व समस्यांना लक्षात घेता महाराष्ट्रातील गरीब व सर्वसामान्य लोकांकरिता दिलासा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व विध्यार्थ्यांना देय असलेले शैक्षणिक वार्षिक शुल्क, पाणी बिल,चालू वर्षातील न.प.व ग्रामपंचायत हद्दीतील कर याबाबीसह विद्युत बिल माफ करण्याची मागणी काँग्रेस नेते हाजी मो.युसुफ पुंजानी यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना केली आहे.
        कोरोना संक्रमण महामारीच्या वाशिम जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री २९ जून रोजी वाशिम दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी कारंजा येथिल कोविड-१९ संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या सिंधी कॅम्प परिसराची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वरील मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, गटनेता अड फिरोज शेकूवाले, नगरसेवक अ.एजाज अ. मान्नान,जाकीर शेख,सलीम प्यारेवाले, सभापती सलीम गारवे, राजू इंगोले, रउफ खान मामु,सै मुजाहिद,अ रशीद,चांद शा, निसार खान,युनूस खान पहेलवान, इरफान खान,जाकीर अली,जावेदोद्दीन,इर्शाद अली,अ आरिफ मौलाना,शमीम फरहत आदींसह कारंजा काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष हमीद शेख आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment