Monday, 29 June 2020

इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला - पालकमंत्री सतेज पाटील - जनतेला न्याय देण्यासाठी केंद्राच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

    कोल्हापूर प्रतिनिधी 
        महागाई वाढवण्याचे काम भाजप सरकारकडून केलं जातंय. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. जनतेच्या दुःखात भाजपला सुख मिळते, अशीच भाजपची भूमिका आहे. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटी इथं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्यायी इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. या प्रसंगी ते बोलत होते. 
              एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी लढतोय. लॉकडाउनमुळं  सामान्य जनतेच्या कंबरडे मोडलंय. त्यामुळं सर्वच घटकात आर्थिक परिणाम जाणवत असताना केंद्र सरकारने इंधन दरवाढ केलीय. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने देश पातळीवर इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू  केले आहे. याच इंधन दरवाढी मुद्यावरून कोल्हापूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज सातत्याने होत असलेल्या  इंधनदरवाढीमुळं सामान्य जनता मेटाकुटीला आलीय. या जनतेला न्याय देण्यासाठी  केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस कमिटी इथं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून या इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकरच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरावर देशात इंधनाचे दर ठरवले जात असताना, देशात इंधनाचे दर महाग का? असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. देशात इंधनाचे दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने  केलीय. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं. या प्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील यांनी देशामध्ये झालेल्या इंधन वाढीमुळे सामान्यांना त्रास होतोय.  या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून अन्न, धान्य तसेच सर्वच वस्तू पुरविल्या जातात. इंधन दरवाढ केल्यामुळे की महागाई वाढते. याचा भार मध्यमवर्गीय आणि सर्वसामन्यावर बसत आहे. त्यामुळं जनतेच्या दुःखात भाजपला सुख मिळते, अशीच भाजपची भूमिका आहे. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.


     या आंदोलनात आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजीवबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,  गुलाबराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, तौफीक मुल्लाण्णी, प्रवीण केसरकर, दिलीप पोवार, सागर चव्हाण, सदाशिव चरापले, सचिन चव्हाण, सुरेश कुऱ्हाडे, संध्या घोटणे, संजय पोवार वाईकर, विद्याधर गुरबे, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, उदयानी साळुंखे, चंदा बेलेकर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment