कोल्हापूर प्रतिनिधी
एसटी म्हणजे विश्वास, हे गेली ५० वर्षे राज्यातील प्रवाशांनी अनुभवलंय. एसटीवरील विश्वासहर्ता कर्मचाऱ्यांनी टिकवून ठेवलीय. त्यामुळे आज कोल्हापूर विभागातून एसटीतुन मालवाहतूक करण्यास सुरुवात केलीय. यात नक्की एसटी महामंडळ यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आज कोल्हापूर राज्य परिवहन विभागाच्यावतीने मालवाहतूक एसटी बसेसची सुरवात करण्यात आली. याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
ज्या बसेस सुरक्षित आहेत मात्र प्रवासी वाहतुकीसाठी त्या बसेस वापरल्या जात नाहीत त्या बसेस माल वाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला राज्य परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यात अशा ३५० मालवाहतूक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ बसने माळ वाहतुक सुरू करण्यात येणाराय. या माल वाहतूक बसचा शुभारंभ परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक अजय पाटील, डिटीओ शिवराज जाधव, स्थानक प्रमुख दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
एसटीची विश्वासहर्ता असल्यामुळे सरकारी कामकाज तसेच बालभारती सारख्या कामांना वेग येईल, असा विश्वास यावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या काळात एसटीने महत्वाची भूमिका बजावलीय. कोकणातील आंबा आणि इतर कामासाठी एसटी उपयोगी आली. एसटीच्या माध्यमातून राज्यात मालवाहतूकीच्या आतापर्यंत १९०० फेऱ्या झाल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला दीड कोटी रुपयांचा नफा मिळलाय. येणाऱ्या काळात एसटीची मालवाहतूक नक्कीच एसटीला उभारी देईल, असा विश्वास देखील परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एसटी स्टँडवरील बसमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मास्कचा वापराबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालण करून प्रवास करावा असं अवाहन प्रवाशांना केले.
No comments:
Post a Comment