गांधीनगर .प्रतिनिधी
उचगाव तालुका करवीर येथील श्रीरामनगरमधील महिलेचा बुधवारी डेंग्यूने मृत्यू झाला. माधवी प्रकाश चौगुले (वय 49) असे मृत महिलेचे नाव आहे.#
गेल्या तीन दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. वैद्यकीय अहवालात तिचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे नमूद आहे. तत्पूर्वी याबाबत उचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीला कळवले होते. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. एक अंगणवाडी सेविका मात्र घर व परिसर स्वच्छ ठेवा असे सांगून गेल्याचेही चौगुले कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, श्रीरामनगर परिसरातील अस्वच्छता हेच डेंग्यूचे कारण आहे. येथे साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव होतो. गतवर्षी येथील रजिया मुसा सुतार या महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता. ग्रामपंचायतीचे साफसफाई कडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, अशाही तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत.#
No comments:
Post a Comment