Thursday, 4 June 2020

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नोकरदारांना दोन्ही जिल्हयामध्ये नोकरीसाठी व येणे-जाणेसाठी परवानगी द्यावी - खासदार धैर्यशील माने

सैनिक टाकळी प्रतिनिधी 
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नोकरदारांना दोन्ही जिल्हयामध्ये नोकरीसाठी येणे-जाणेसाठी परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई व सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचेकडे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे.          दरम्यान, सांगली जिल्ह्यातील बहुतांश गावामधील अनेक तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस आहेत.तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ही बहुतांश गावामधील अनेक तरुण सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस आहेत.सध्या अनेक कारखाने सुरु झाले आहेत परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असल्यामुळे या तरुणांना नोकरीसाठी दोन्ही जिल्हयात येणे-जाणेस अडचण निर्माण होत आहे. दि.२२ मार्च  पासून लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे हे नोकरदार घरी बसून होते.त्या काळात त्यांना पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सध्या उद्योग सुरु झाल्यामुळे या नोकरदारांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीस जाणे गरजेचे असल्यामुळे अशा युवकांना कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यामध्ये व सांगली जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणे-जाणेची परवानगी देणेसाठी योग्य ती कार्यवाही करुन सहकार्य करण्याची विनंती खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment