हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने कोविड १९ - जिल्हा आपत्ती व्यवस्थापनसाठी एक लाख पंचवीस हजार रुपयाचा धनादेश पालकमंत्री नाम. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालकमंत्री नाम. सतेज डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट काम केले असल्याने नाम.पाटील यांचे मुख्याध्यापक संघाच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले.
मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांचे प्रश्न शासनदरबारी मांडून सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता टिकविण्याबरोबर गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. महापूरामुळे झालेल्या नुकसानीत शाळा व विद्यार्थ्यांना सहाय्य केले आहे. खेळाडूंना मदत, विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत, अनाथ विद्यार्थ्यांना मदत करीत आहे.
यावेळी शिक्षक नेते दादा लाड, कृती समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, लोकल ऑडीटर मिलिंद पांगिरेकर, इरफान अन्सारी आदी उपस्थित होते.
फोटो
पालक मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना धनादेश देतांना चेअरमन सुरेश संकपाळ शिक्षक नेते दादा लाड बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर
No comments:
Post a Comment