उदगीर प्रतिनिधी:- *गणेश मुंडे*
तालुक्यातील लोहारा ते शेकापूर शिव पादंण शेत रस्ता उदगीर तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पोलिस बंदोबस्तात खुला केले आहे.या रस्त्यावरील वाहातुक करणारे अनेक शेतक-यांचा शेत रस्त्याची वाहातुक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोहारा ते शेकापूर शिव रस्ता हा जुना वहिवाट पादंण रस्ता असून या रस्त्यावर लोहारा येथील अनेक शेतकरी आहेत.मात्र वाटेत असलेले काही शेतकरी यांनी शिव रस्त्या वरील गट क्रमांक 509 या ठिकाणी वहिवाटेवर वाहातुकीला अडथळा निर्माण केला होता. यामुळे शेतकरी गंगाधर तुकाराम मोमले व ईतर यांनी तहसीलदार उदगीर यांच्याकडे रस्ता मोकळा करुन देण्यासाठी विनंती अर्ज केला होता.हा विनंती अर्ज तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी लोहारा ते शेकापूर शिव पादंण रस्ता शेतकरी यांनी दोन दिवसात खुला करुन नाही दिल्यास 20 जुन रोजी महसूल प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हा रस्ता खुला करुन देण्यात यावा,असे आदेश दिले आदेश देऊनही शेतकरी यांनी रस्त्यातील अडथळा काढून घेतला नसल्याने तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या आदेशा प्रमाणे हेर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी पंडीत जाधव यांनी हा रस्ता खुला करण्या ची कार्यवाही केली. लोहारा येथील तलाठी विनाता पाटील,प्रशिक्षणार्थी तलाठी संगीता काळे यांच्यासह पोलिस बंदोबस्तात हा लोहारा ते शेकापूर शिव पादंण रस्ता मोकळा झाला आहे.यामुळे या रस्त्यावरील शेतकरी यांना हक्काचा कायमचा रस्ता मिळाला आहे. यावेळी मंडळ अधिकारी पंडीत जाधव,तलाठी विनिता पाटील,तलाठी संगीता काळे,पोलिस उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड,सरपंच रमेश मोमले, पोलिस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त अध्यक्ष त्रिंबक बिरादार, सुनिल पाटील,पोलीस किशन शेळके, पोलीस अनुसया गोपे,पोलीस नितिन जेवळे, मोहन पाटील,शिवाजी पाटील, गंगाधर मोमले, हणमंत बिरादार, विठ्ठल पाटील, भरत बिरादार, पाशा पठाण, ओमप्रकाश गिरी, उत्तम बिरादार, उमाकांत मोमले यांच्यासह सर्व शेतकरी उपस्थित होते. सर्वानी हा रस्ता खुला केले बाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे व मंडळ अधिकारी पंडीत जाधव यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment