प्रतिनिधि *आरिफ़ पोपटे*
*कारंजा तालुक्यातील* *धनज बु।।* येथे कोरोना या संसर्गजन्य विषाणू पासून जनतेचे बचाव व्हावा यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी पण घेणे तितकेच महत्वाचे आहे...याच हेतूने आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था वाल्हई, कारंजा (लाड) यांच्या तर्फे धनज बु ।। येथील पोलीस कर्मचाऱ्यांना फेस प्रोटेक्टर मास्क व सॅनिटायझर चा वाटप करण्यात आला. ऐन पावसाळा तोंडावर असल्यामुळे जे नियमित कापडी मास्क चा वापर होत आहे ते मास्क पावसामुळे ओले होतात याच उद्देशाने हे प्लास्टिक कोटेड मास्क पोलिसांना वाटप करण्यात आले आहे.नेहमी समाज कार्यात अग्रेसर असलेल्या व तसेच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश, या सारख्या विविध उपक्रमात सहभाग असलेल्या
आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था वालई, कारंजा यांच्या संचालक प्रा. निर्मल ठाकूर व संस्थापक अध्यक्ष कविताताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे समन्वयक गोपाल खाडे, हेमंत पापडे, अजय मोटघरे ,विजय भड यांनी आज दि 01 जून ला धनज पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना व तसेच धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढंगारखेड चेक पोस्ट, दोनद चेक पोस्ट येथील पोलिस कर्मचाऱ्यांना या फेस प्रोटेक्टर मास्क व सॅनिटायझर चा वाटप केला..त्यांचा या कार्याप्रती धनज बु चे ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी त्यांचे आभार मानले...
No comments:
Post a Comment