Tuesday, 2 June 2020

कृषी सखी व महिला बचत गटाला प्रशिक्षण

** 
प्रतिनिधी रजनीकांत वानखेडे वाशीम 
मालेगाव तालुक्यातील इरळा येथे  शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे याकरिता सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणी तसेच बीज प्रक्रिया याविषयीचे प्रात्यक्षिक कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली  कृषी सहाय्यक नागेश म्हेत्रे यांनी दिनांक 28 मे रोजी आयोजित केला होता कृषी क्षेत्रात महिलांच्या सहभागातून कृषी उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी सखी, पशु सखी व महिला बचत गटाच्या महिलांना बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नागेश म्हेत्रे कृषि सहाय्यक यांनी कृषी सखी, पशु सखी ,सीआरपी ,महिला बचत गट अध्यक्ष, सचिव, सदस्य ,महिलांना बियाण्याचे प्रतवारी, चाळणी,उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया,बियाणे बद्दल सोयाबीन उत्पादनात गंधकाचा वापर माती परीक्षण तसेच सरी-वरंब्यावर सोयाबीन पिकाची पेरणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सोयाबीनचे बाह्य आवरण नाजूक व पातळ असल्याने त्याची उगवण शक्ती तपासणी गरजेचे असते. त्यासाठी 100 बिया वाटी अथवा पोत्यात टाकावेत त्यात पाणी टाकावे पंधरा मिनिटांनी काढून ते बी कापडावर टाकावे. 15 मिनिटांनी पाणी काढून टे बी कापडावर टाकावे जर 70 पेक्षा जास्त आवरणाला सुरकुत्या पडल्या तर ते घरचे बियाणे पेरणी योग्य समजावे, पुरेसे 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी,2इंच अथवा 5 सें.मी पेक्षा जास्त खोलवर पेरणी करू नये अशी माहिती कृषी सहाय्यक नागेश म्हेत्रे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांनी कार्यशाळेत दिली.
सदरच्या प्रशिक्षणास गावचे सरपंच केशव ठाकरे,कृषी सखी अनुसया वानखेडे,  पशु सखी सुनिता घुगे, सीआरपी मायावती घुगे, शोभाबाई सावडे,वैशाली कंकाळ,देवका दहात्रे,सविता कंकाळ,ज्योती कंकाळ,विजया कंकाळ,कांता दहात्रे,शोभाबाई ठाकरे किर्तिका सावळे,मीना कंकाळ,सुनिता ठाकरे,चंद्रकला ठाकरे, इंदुबाई सावळे व अरुणा कैयवास आदी महिला उपस्थित होते

No comments:

Post a Comment