Wednesday, 17 June 2020

किनीयल्लादेवी येथील कोरोना रूग्ण पाॅझेटिव्ह. मा जि.प अध्यक्ष राहुल केंद्रे याची तात्काळ भेट .

उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे 

उदगीर तालुक्यातील किनीयल्लादेवी येथे तीन कोरोना रूग्ण पाॅझेटिव्ह आल्यामुळे गावात भिंतीचे वातवरण निर्माण झाले आहे या भागास कोरोना प्रतिबंधक क्षेत्र घोषीत करून हा परिसर बंद करण्यात आला आहे तर किनीयल्लादेवी येथील या तीन व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 14 व्यक्तींना ताब्यात  घेऊन तपासनीसाठी उपजिल्हा रूग्णालयात उदगीर येथे पाठवण्यात आले आहे. 
किनीयल्लादेवी येथे तीन कोरोना रूग्ण पाॅझेटिव्ह आल्याची माहिती मिळताच जि.प.अध्यक्ष  राहूल भैया केंद्रे यांनी तात्काळ भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला तसेच गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, प्रा.पंडित सूर्यवंशी,कल्याण पाटील माजी सभापती,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.प्रशांत कापसे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. स्वाती सोनवने,वैद्यकीय अधिकारी डॉ. कानवटे मॅडम,जिवनराव बिरादार, उपसरपंच संतोष बिरादार, तलाठी जानतीने, ग्रामसेवक सोनकांबळे, डाॅ संतोष गुनाले, बि.डी.धुप्पे, एच.एन.सुर्यवंशी सिस्टर, ए.व्हि.बिरादार.शिस्टर, व्हि.व्हि.जगताप मॅडम, आशा कार्यकर्ती विद्या कांबळेे , अनिता राजे ,अंगणवाडी कार्यकर्ती कमल जाधव, संगीता बिरादार, प्रभावती वाघमारे, यांनी ही या क्षेत्रातील लोकांची माहिती घेऊन आरोग्य विभागस कळविले आहे.तसेच वाढवणा पोलिस स्टेशन चे साहाय्य पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी परीस्थितीचा आढावा घेऊन चोख बंदोबस्त ठेवला आहे.

No comments:

Post a Comment