Wednesday, 17 June 2020

माणूसकी फौंडेशनच्या अन्नदान कार्याला चंदुर विकास युवा मंचचा हातभार

कोल्हापूर प्रतिनिधी 
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूंमुळेे गोरगरिबांना जगणे मुश्किल झाले आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीब निराधार, हातावरचे पोट असणाऱ्यांना व गरजु लोकांना गेलेे सलग 80 दिवस रोज 800 ते 1000 लोकांना निस्वार्थी पणे अन्न देण्याचे काम इचलकरंजी येथील  माणुसकी फौन्डेशन करत आहे. माणूसकी फौंडेशन सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत चंदुर मधील चंदुर विकास युवा मंच यांच्या वतीने 200 किलो धान्य देऊन या पवित्र अन्नदानाच्या कार्याला मदतीचा हातभार लावुन माणसातील माणुसकीचे दर्शन दाखवून दिले. 

यावेळी बंडा पुजारी, उमेश पाटील, संभाजी पुजारी, जगदीश पाटील, स्वप्नील पाटील, आप्पा पाटील, विकास माने,बाजीराव माने,श्रीकांत पाटील, स्वप्नील जगताप, भाऊसो ऐनापुरे,स्वप्नील खटावकर, अमित मुनोळे, त्याच बरोबर माणुसकी फौन्डेशन चे सागर बाणदार व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment