Sunday, 21 June 2020

अवैध दारू बंद करा, अशोक नगर नागरिकांचे पोलीस स्टेशन ला निवेदन सादर

** 

*आरिफ़ पोपटे*

कारंजा - स्थानिक अशोक नगर मधे कित्येक दिवसांपासुन  अवैध दारू विक्री ने नागरिक त्रस्त आहेत एकीकडे देशाभरामधे कोरोना वायरस ने थैमान गाठले आहे. त्यामधे वाशिम जिल्हा हा सुद्धा रेड झोन आला. त्यामधे कारंजाचे सर्वात जास्त म्हणजे 23 कोरोना पेशंट आजघडीला कारंजा मधे आहे व कारंजाचे प्रमुख गांधी चौक, शिवाय मठ, भारतीपुरा, व माळीपुरा हे प्रतिबंद क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. त्याच अनुशंधाने कारंजा लाड मधे गेल्या तिन दिवसांमधे स्वयंफुर्तीने चार दिवसांचा जनता बंद ठेवण्यात आला आहे त्याच जनता बंदची काही समाजद्रोही मात्र ऐैशितेशी करण्यात गुंग आहे व अवैध मार्गाने पैसा कमवण्यात व्यस्त आहे त्याचा त्रास संपुर्ण कारंजावासियांना होत आहे. 


शहरात जे काही प्रतिबंदीत क्षेत्र आहे तेथील नागरिक अशोक नगर येथे अवैध मिळणाऱ्या दारू पिण्याकरिता येतात व त्यांना हटकले तर वादविवाद सुद्धा करता. त्यामुळे अशोक नगर येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. असे कारंजा पोलीस स्टेशनला 20-6-20 रोजी 12 वाजता अशोक नगर वासियांतर्फे सामाजिक कार्यकर्ता यांनी फिजिकल डिस्टंन्स व जनता बंद चे पालन करून शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांना निवेदन देण्यात आले. 


यावेळी दारूबंदी वर सविस्तर चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले निवेदन देतेवेळी तरूण मित्र मंडळ अध्यक्ष किशोर उके, सामाजिक कार्यकर्ता सचिन खांडेकर, अँड. कुंदन मेश्राम, बंटी बोरकर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment