प्रतिनिधी :
जागतिक योग दिन देशात उत्साहात साजरा झाला. शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी योगासनांचा प्रचार व प्रसार आयुष भारत संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांनीही केले योगासने करत सुदृढ आरोग्य राखण्याचा निश्चय केला. आयुष भारत तर्फे योग दिन देशात उत्साहात साजरा करण्यात आला आयुष भारत संस्थापक अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी व योग शिक्षिक डॉ.विश्वास फापाळे यांनी सूर्यनमस्कार व प्राणायाम यांची माहिती देत उपस्थितांकडून त्याचा सराव करून घेतला. आंतरराष्ट्रीय योगा समुपदेशक डॉ.सुहास शेवाळे यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगासनांचे फायदे सांगितले. आयुष भारत राष्ट्रीय सचिव डॉ.किशोर बोकील यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. आयुष भारत तर्फे डॉ.विश्वास फापाळे यांना ‘योग आचार्य’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. डॉ.किशोर बोकील यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमांमध्ये आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी, डॉ.शाहिन मुलाणी, डॉ.सारिका फापाळे, डॉ.सुहास शेवाळे, डॉ.रसुल पठाण (पुस), डॉ.काशिनाथ माळी, डॉ.प्रवीण निचत, डॉ.सिता भिडे, डॉ.शब्बीर पठाण, डॉ.फिरोज पठाण व आदी मान्यवर उपस्थित होते. आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी योगनिकेतनच्या योग शिक्षकांना आमंत्रित केले होते. डॉ.विश्वास फापाळे त्यांनी योगसाधनेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम, योगासने व सूर्यनमस्कार करण्यात आले.
आयुष भारत यांच्यातर्फे देशातील विविध राज्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून योगासनांचे कार्यक्रम घेण्यात आले.
No comments:
Post a Comment