Saturday, 27 June 2020

मंगरुळपीर येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेशाने बिलालनगर परिसर सिल


 मंगरुळपीर प्रतिनिधी 
रजनिकांत वानखडे दि.२७ -
आज सकाळी अकोला येथे प्राप्त झालेले कोरोना विषयक चाचण्यांचे अहवालात शहरातील बिलाल नगर परिसरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने याबाबत संबंधीत व्यक्तीचे संपर्कातील नागरिकांचा शोध सुरु केला आहे. 
 दरम्यान, कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या आजचे एका आदेशान्वये या परिसराला कान्टेंन्मेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. बिलालनगर परिसर सिल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश मंगरुळपीर नगर परिषद व पोलिस स्टेशनला देण्यात आलेले आहे. याभागातील नागरिकांचे मुक्तसंचारावर बंदी घालण्यात आली असून आदेशीत चतु:सिमे मध्ये येणारे सर्व वाहतूकीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. 
     या चतु:सिमे मध्ये  कॉन्टेंन्मेंट झोन म्हणून राहणार आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्यास व जाण्यास मज्जाव घालण्यात आला येऊन मनाई हुकुम आदेश लागू करण्यात आलेला आहे. 
 नागरिकांनी प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे व कोरोना पासून आपले रक्षण करावे असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment