Wednesday, 10 June 2020

वनपट्टे धारकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार - खासदार डॉ . हिना गावित

                                    *नंदुरबार ( वैभव करवंदकर )  ------*            जिल्ह्यातील असंख्य वनपट्टे धारकांना शासनाच्या लाभ घेण्यासाठी महसूल दप्तरी तसेच कृषी खात्याकडे दाखला घेण्यासाठी फिरावे लागत असे . दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला की ,   वनपट्टे धारकांना वनविभागाचे वनपाल त्या परिसरात सर्वे करून तेथील वनपट्टे धारकांना  दाखला देणार. त्या दाखल्याच्या आधारावर महसूल प्रशासन व कृषी विभाग त्यांना शासनाचे लाभ देणार अशी माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.                                                        दिशा समितीच्या बैठकीनंतर खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित उपस्थित होते यावेळी खासदार हिना गावित म्हणाल्या की ,  केंद्र सरकार कडून ३० योजना राबविण्यात येत आहे. या  योजनांच्या कार्यवाही संदर्भात सर्व विभागाच्या आढावा घेण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशी दिनांक एक जुलै रोजी जिल्ह्यातील 507 ग्रामपंचायती  ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येत आहे. यासाठी बी एस एन एल व बी बी एन एल यांच्याकडून ग्रामपंचायतींना नेटवर्क करण्याचे काम सुरू आहे . एक जुलै पर्यंत जिल्ह्यातील 507 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कमार्फत ऑनलाइन होऊन डिजिटल होणार आहे . जिल्ह्यातील दीडशे ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्क जोडून कामकाज सुरू होणार आहे . सध्याच्या स्थितीत दहा ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर मार्फत जोडण्यात आल्याचे कामकाज सुरू आहे. यामार्फत ग्रामपंचायती अंतर्गत गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्र  ,  आरोग्य केंद्र यांच्या कामकाजावर जिल्हा परिषदे  मार्फत ठेवण्यात येणार आहे.  तसेच नंदुरबार येथील रेल्वे स्थानकात खते उतरवण्यासाठी रेल्वे रँक मंजूर झाला असून त्याचेही काम येत्या आठ ते नऊ महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली.                                         केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून वृद्ध  विधवा व   दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू आहेत. या योजनेमध्ये ज्यांना मोठा आजार आहे . कॅन्सर ,  शिकशील , अशांना देखील या योजनेच्या लाभ घेता येणार आहेत.  नंदुरबार जिल्ह्यातील ५५ हजार 350  लाभार्थी या योजनेच्या लाभ घेत असून ग्रामपंचायत स्तरावरून शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment