उदगीर प्रतिनिधी *गणेश मुंडे*
उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु) येथील पोलीस ठाणे वाढवणा सहा. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बाळासाहेब मनोहर नरवटे यांना केंद्रीय ग्रह विभाग तसेच महाराष्ट्र पोलीस दलामार्फत आंतरिक सुरक्षा पदक आज जाहीर झाले आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सन 2013 ते 2016 या वर्षात त्यांनी मोलाचे कार्य केलेल्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल हे पदक जाहीर करण्यात आले आहे.त्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने,अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील,वाढवणा पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी,गावकरी व परिसरातील नागरीकासह सर्वच स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
No comments:
Post a Comment