सैनिक टाकळी प्रतिनिधी
प्रहार संघटनेच्या मागणीनुसार सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली .
शालेय शिक्षण विभागाने या वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मुलांना मिळावीत यासाठी नियोजन केले होते. त्या साठी केंद्र शाळेतुन प्रत्येक शाळे साठी पुस्तकाचे वितरण करण्यात आले होते कोरोनाच्या पार्श्वभूमी वरती यावर्षी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणार की नाही याबाबत पालकांच्या मध्ये संभ्रम होता . प्रत्येक वर्षी मुलांचे स्वागत नवीन पाठ्यपुस्तक वाटप करून होत असे परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना सालाबादाप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके घरपोच करण्यात आली .यावेळी या विभागाचे प्रमुख आर एम पाटील उदय पाटील ए टी गुरव बी एम कुंभार सयाजी पाटील खोपडे आर एस या शिक्षकांनी मास्क सँनिटायझर चा वापर करून पाठ्यपुस्तक वाटप केले.
No comments:
Post a Comment