Thursday, 18 June 2020

नंदवाळच्या ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी

.     नंदगाव प्रतिनिधी : 
रायगड व दापोली येथे झालेल्या  चक्रीवादळामुळे .तेथील घरांचे आतोनात नुकसान झाले आहे .तेथील परिस्थिती खुपच  भयानक झालेली आहे.आणी या परिस्थितीमध्ये तेथील लोकांना सावरण्यासाठी एक छोटासा मदतीचा हात म्हणून सदगूरू काडसिद्धेश्वर स्वामिजी यांच्या कल्पनेतून व प्रतिपंढरपूर म्हणून मान असणाऱ्या नंदवाळ मधील ग्रामस्थ तसेच विद्या मंदीर नंदवाळ ( ता करवीर ) व कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने त्या नुकसानग्रस्त गरजूंना कौले पाठवण्याचा निर्णय घेतला .
विद्या मंदीर नंदवाळ शाळेची काढून ठेवलेली कौले लिलाव पध्दतीने विकत घेवून  सदगुरू काड सिध्देश्वर महाराज यांचे शिष्य श्री.तानाजी निकम,श्री.सुनिल पाटील,श्री. दिगंम्बर पाटील यांनी  गावातील  तरूणांच्या मदतीने  ट्रक मध्ये कौले भरून पाठवून दिली . विद्या मंदीर नंदवाळ शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले . परिसरातून निकम कुटूंबीय व नंदवाळ ग्रामस्थांचे या चांगल्या राबविलेल्या  उपक्रमाचे कौतुक होत आहे .

No comments:

Post a Comment