Monday, 29 June 2020

संजय घोडावत पॉलीटेक्नीच्या ई लर्निंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद ५००० हुन अधिकचा सहभाग



हातकणंगले /प्रतिनिधी

मिलींद बारवडे
संजय घोडावत पॉलीटेक्नीक मार्फत दि.२५ जून ते २७ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ई-लर्निंग या ऑनलाईन कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास ५००० हुन अधिकांचा सहभाग या कार्यशाळेत होता. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांसाठी अशा पद्धतीची कार्यशाळा घेणारे अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलीटेक्नीक हे राज्यातील पहिले पॉलीटेक्नीक ठरले आहे.
     या कार्यशाळेचे उदघाटन कोल्हापूर चे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य  विराट गिरी यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून देत ही कार्यशाळा शिक्षकांसाठी कशी उपयुक्त आहे व या कार्यशाळेत शिकविल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या अध्यापनात कसा उपयोग करायचा याची माहिती दिली.याचबरोबर देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या शिक्षकांचे स्वागत केले. 
      विश्वस्त विनायक भोसले यांनी येणाऱ्या काळात शिक्षकांनी या अध्यापन कौशल्यांचा वापर आपल्या अध्यापनात करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित केले तसेच लॉकडाऊनच्या काळात संजय घोडावत शिक्षण संकुलाने ऑनलाईन शिक्षण पद्धत कशी यशस्वी राबविली हे सुद्धा आवर्जून सांगितले तसेच संशेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
     या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रा.सागर चव्हाण यांनी अध्यापनात गुगल तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये गुगल ड्राईव्ह, गुगल क्लासरूम तसेच व प्रा.आशिष पाटील यांनी गुगल फॉर्म याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा.धीरज पाटील, प्रा.विनायक पावटे यांनी  गुगल मीट बद्दल तर प्रा.रईसा मुल्ला यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील  एक्सेल व पॉवरपॉईंट चा प्रभावी वापर कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी प्रा.स्वप्नील ठिकणे यांनी दीक्षा, ई पाठशाळा, ई क्लास, बालभारतीचा वापर, ऑनलाईन परीक्षा, लाईव्ह व जामबोर्ड चा वापर याविषयी मार्गदर्शन केले तर प्रा. नरेश कांबळे यांनी यु ट्यूब व त्याची वैशिष्टये या विषयावर मार्गदर्शन केले. 
    या कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम डाएट सोलापूर चे प्राचार्य डॉ.इरफान इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी अकॅडमीक डीन प्रा.एन.एस.पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.शुभांगी महाडिक, प्रा.रईसा मुल्ला, प्रा.आशिष पाटील व टीम ने अथक परिश्रम घेतले. 
ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
      फोटो 
अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलीटेक्नीक कॉलेजच्या राज्यस्तरिय ई लर्निंग ऑनलाईन कार्यशाळेतील मार्गदर्शक प्राचार्य विराट गिरी व त्यांचा प्राध्यापक वर्ग.

--

No comments:

Post a Comment