गेली कित्येक दिवस खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. ताराबाई पार्क मधील किरण बंगला ते मोहिते हाऊस या रस्त्यावरून जाताना लोकांना रस्त्यावर खड्डे पडले आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नव्हते. प्रशासनाने कित्येक दिवस बेदखल केलेल्या या रस्त्याची पँचवर्कचे काम स्वखर्चाने माजी नगरसेविका सौ. पल्लवी निलेश देसाई व माजी नगरसेवक श्री निलेश देसाई यांनी करून घेतले.
ताराबाईपार्क येथील किरणबंगला ते मोहिते हाऊस या रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते तसेच या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळाही होत होता तसेच अपघात ही होण्याची शक्यता होती .या सर्वाची दखल घेत देसाई दांपत्याने लोकांचे हित लक्षात घेऊन तसेच अपघात टाळण्यासाठी स्वखर्चाने या रोडचे पँचवर्क करून घेतले. तसेच तो रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्यात आला.
No comments:
Post a Comment