कोल्हापूर प्रतिनिधी
भारत स्वच्छ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच भारत स्वच्छ केला होता. मात्र तेवढ्यापुरता इव्हेंट न करता सातत्याने स्वच्छता अभियानाची गरज आता आहे.
कोल्हापूर शहरामध्ये गेले कित्येक रविवार हक्काची सुट्टी न घेता मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी हे स्वत: कचरा काढून शहराला स्वच्छ करताना दिसत आहेत. ग्रामस्वच्छता अभियानावेळी हाती घेतलाला झाडू कलशेट्टी यांनी अद्यापही कायम सोबत ठेवला आहे. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आपण काम केल्याचं पाहिल्यास इतर कर्मचारीही जोमाने काम करतील, केवळ भाषणं न करता कृतीतून आपला विचार लोकांपर्यंत मांडायचा असतो, लोकांना सवय लावायची असते असे कलशेट्टी यांनी मागे एकदा म्हटले होते .
काल सुद्धा रविवारी कसबा बावडा पंचगंगा नदी घाट परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात स्वरा फौंडेशन व आरोग्य विभाग कसबा बावडा आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, व कर्मचारी, व वाय बी पाटील शाळेचे दत्तात्रय चौगुले सर,यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कसबा बावडा पंचगंगा नदीवरील घाट परिसरात स्वच्छता करून कोमनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षरोपणसुद्धा करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात प्रमोद माजगावकर, अजिंक्य पाटील, राहुल कुंभार, यश कुंभार, अपूर्वा खांडेकर, प्रणव कागले, अक्षय दळवी, अमित ठाणेकर, सरफराज , पियुष हुलस्वार, आदित्य पाटील व स्वरा फौंडेशनचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
स्थानिक नगरसेवक डॉ. संदीप नेजदार व तुषार नेजदार यांनी विशेष परिश्रम घेतले. या ठिकाणी जवळपास एक डंपर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
आयुक्त कलशेट्टी यांनी परिसरातील स्मशानभूमीस भेट देऊन नुतनीकरणा बद्दल समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment