Monday, 8 June 2020

जलसाक्षरतेच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास व जलनियोजन वेबीनार व ईसंवाद दोनदिवशीय कार्यशाळा पं.सं.मं.पीर येथे संपन्न

*.* 
रजनिकांत वानखडे 
वाशिम प्रतिनिधी
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन, जससाक्षरता केंद्र यशदा यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवशी वेबिनार.मंगरूळपीर तालूक्यात मा.श्री.किशोर बागडे साहेब तहसीलदार, मा.श्री.आर.बि.पवार साहेब गटविकास अधिकारी मार्गदर्शनाखाली आणि जलदूत रविंद्र इंगोले यांच्या सहकार्याने पार पडला या वेळी ग्रामसेवक, रोजगार सेवक, जलदूत आणि मग्रारोहचे तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सोशल डिस्टटिगचा नियम पाळून वेबिनारचे नियोजन करण्यात आले होते.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणी आमचं गाव आमचा विकास व इतर योजनाची सांगळ घालून गाव पाणीदार करण्यासाठी मार्गदर्शन वेबिनार आयोजित केला होता.डाॅ.सुमंत पाडे साहेब,  कार्यकारी संचालक, यशदा पुणे यांनी जलक्षेत्रातील अव्हाने, जलसाक्षरता या विषयावर तर, डाॅ.वडगबागकर सर जलयोध्दा तथा, भुगर्भ तज्ञ यांनी ग्रामलोटाचा ताळेबंद या विषयावर,श्री.आनंद पुसावळे संचालक  यशदा पुणे यांनी जलसाक्षता फळी या विषयावर, श्री.  एकनाथ डवले साहेब सचिव कृषी जलसंधारण,यांनी मार्गदर्शन केले, श्रीमती अश्विनी कुलकर्णी अभ्यासक मग्रारोहयो प्रगती अभियान नाशिक यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंबलबचावनी कशी करायची संभाव्य अडचणी आणी उपयोजना व  वैशिष्टे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.श्री.नृसिंह मित्रगोत्री  संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्य पुणे.डाॅ.शरद कुलकर्णी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे मार्गदर्शन केले. नंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम झाला.वेबीनारचा कार्यक्रम उत्साहत पारपडला.या कार्यक्रमाची तांत्रिक जबादारी बाळकृष्ण  गंगावणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो आणि पंचायत समीती तांत्रिक अधिकारी मग्रारोहयो यांनी केले आभार जलदूत रविंद्र इंगोले यांनी केले.

No comments:

Post a Comment